STORYMIRROR

SANJAY SALVI

Children Others

3  

SANJAY SALVI

Children Others

सोनपरी

सोनपरी

1 min
13K


सोनपरी ग सोनपरी,

येशील का ग माझ्या घरी,

माझं घर आहे डोंगरावरी,


बाजूला आहे खोल खोल दरी,

उंच उंच झाडे मोठी,

खेळतो आम्ही नदी काठी,


मासोळी होऊन मारतो सूर,

फुलपाखर होऊन जातो दूर,


भरपूर पाणी अन मोकळी हवा,

खायला आहे रानातला मेवा,


आकाशी आहेत रवी अन शशी,

दिवस न रात्र आहे गम्मत खाशी,


सारे काही आहे पण नाही एक परी,

येना परी राणी येना ग घरी,


वाट पाहतो आम्ही येशील कधीतरी,

वाट पाहतो आम्ही येशील कधीतरी.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Children