STORYMIRROR

Kishor Zote

Abstract

3  

Kishor Zote

Abstract

सोंग ( सहाक्षरी )

सोंग ( सहाक्षरी )

1 min
314

देवीचे ते सोंग

पुरुषच घेई

पाठीमागे भोप्या

देवीला आवरी


शेंदुर तोंडाला

लिंबू तलवारी

दैत्य नाचायचा

तिच्याच समोरी


चौका चौकात हो

थांबायचे सोंग

बाया लेकरांना

पायी ठेवी मग


रेवडया उधळी

नवस फेडणी

त्या इंगळावर

चाले अनवाणी


दिवसभरच

गजबजे गाव

एकत्र येतसी

रंक आणि राव


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract