सोळा जून...!
सोळा जून...!


सोळा जून(16)
पाचवा लॉकडाऊन
ही सोळाव्या दिवसाची सुप्रभात...!
ही येता सुप्रभात वाटते
सो सावे लागते बहुत
चो ळा मोळा होतो जीव
व्या धीचे येत भय अंतरात...
दि वसामाजी दिवस जाती
व रकरणी दुःख अंतरीचे लपवून
सा सुरवास भोगतो देवा घेऊनी
चि डचिड न करता खेळ तुझे खपवून....
सु गावा देखील लागला नाही
प्र थम स्वीकारता लॉकडाऊन
भा ग्य कसले आले नशिबी
त डफडता जीव चालला कावून...
आता पावसाची रिपरिप
नसती पाठीशी किरकिर
उठते कधीतरी सुखाची लकीर
जीवन होत चालले फकीर....
कफल्लक झाली अवस्था
किती खाव्या रे खस्ता
अवघड जीवनाचा रस्ता
टिकेल का रे कधी आस्था....?
कर्ता करविता तू भगवंता
पाहू नको रे आमच्या अंता
नांदू दे सौख्याची सुबत्ता
तुझीच खरी रे आम्हावरी सत्ता....!
सुप्रभात...!