सोबती
सोबती
सोबती..
सुखात साथ नाही दिली तरी हरकत नाही
दुःखात मात्र एकमेकांची साथ सोडू नये..
ओठांवर हसू दिलं नाही तरी चालेल
डोळ्यात अश्रू मात्र यायला नको..
राग येऊ दे कितीही
प्रेम फक्त कमी व्हायला नको..
दुरावा कितीही असला तरी हरकत नाही
आपुलकीची भावना संपायला नको..
हे माझं ,ते माझं म्हटलं तरी चालेल
फक्त माझं म्हणू नये..
जीवन प्रवासात थोड्या अंतरावर थांबलो तरी चालेल
पण चालताना एक सोबती म्हणून साथ कायम असावी..
