संवाद
संवाद
तुझ्या माझ्यातला संवाद वाटते कधीच संपू नये
कुरबूर थोडी असली तरी बोलणे आपले थांबू नये
अबोला धरावा मनी असे वागणे नाही बरे
मनाचा निचरा करत बोलते व्हा नेहमी खरे
मनात सलनारी वेदना येऊ द्यावी ओठांवर
शब्द शब्द झेलावेत ओजंळीतल्या बोटांवर
संवाद दोघातला कायम सकारात्मक असावा
एक जरी चिडला तरी दुसरा शांत बसावा
तानले की तुटते हा नियम ध्यानी असावा
नात्यातल्या प्रेमळ दुवा नेहमी सच्चा असावा
