STORYMIRROR

Vijay Sanap

Drama

2.5  

Vijay Sanap

Drama

संताची संगत

संताची संगत

1 min
15.3K


माय बाप सांगे माझे

ज्ञान माऊलीची कथा

माझा सुखाचा सागर

त्यांच्या पायावरी माथा ।।


काय संताची ती वाणी

मुखी अमृताचे बोल

सांगते हरि कीर्तन

रूजे हृदयात खोल ।।


संत येती ज्याच्या घरा

तिथे दिवाळी दसरा

अशा माझ्या माऊलीचा

करा उत्सव साजरा ।।


तुकाराम ज्ञानोबाची

गुणगान मी करतो

सांज सकाळी स्मरण

नाम संताचे भजतो ।।


माझ्या तुकोबाची गाथा

कशी पाण्यावर तरे

होती नाम रूप शक्ती

भाव भक्तिचे अंतरे ।।


संत असावे निर्मळ

भाव अंतरी मनाचे

जसे गंगेचे ते जल

तसे प्रांजळ मनाचे ।।


संत सांगती जनाला

धरा संताची संगत

कामामध्ये राम भजा

नाही संसार पांगत ।।


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Drama