संत
संत
समाजाला माणुसकीचे धडे
शिकवून गेलेत हे संत महंत
ठेवूया पावलावरीच पाऊल
नको मनी भेदाभेदाची खंत
निवृत्ती ज्ञानेश्वर अन् सोपान
नामदेव एकनाथा तुकाराम
खांद्यावरती वारकरी पंथाची
घेऊन ध्वजा जपले हरिनाम
मुक्ता जनाई नि बहिणाबाई
घरकामासंगे लिहिले अभंग
विठूचरणीच तनमन अर्पूनी
भजला संतांनी सखा श्रीरंग
गोपालागोपाला देवकीनंदन
निरक्षर डेबूजीची शिकवण
ग्राम स्वच्छतेचा मंत्र जपला
बिंबवली सद्विचारी साठवण
शिर्डीचे साई शेगावी गजानन
होऊन गेले स्वामीस्वरुपानंद
अक्कलकोटचे स्वामी समर्थ
जागवला मनी नामाचा छंद
