.संत गाडगे महाराज...!
.संत गाडगे महाराज...!
संत गाडगे महाराज....!
सं स्कारची एकच पणती
त न्मयतेने पेटवली
गा वकोस सारा पिंजून
ड बरे दुःखाचे मूजविले
गे ले सौख्य दारीचे
म जल दरमजल करीत
हा कारीत माघारी आणले
रा ज स्वच्छतेचे जाणून
ज ळमटे जातीयतेची काढली जाळून
स्वतः खराटा हाती घेऊन
भगवन्त दाखविला माणसात
देऊळ आवहेरून आणले
परमेश्वरास जवळी आपल्या भेटीस
जाणला ज्यांनी परमेश्वर
देह धारण करूनी हा नश्वर
संत गाडगे महाराज म्हणती
पाहुनी त्यांच्या ठायी ईश्वर...!
