STORYMIRROR

Anupama TawarRokade

Inspirational Children

3  

Anupama TawarRokade

Inspirational Children

संस्कारांचा सडा

संस्कारांचा सडा

1 min
280

संस्कारांचा सडा

मनावर पडतो

छोट्याश्या गोष्टींनी

माणूस घडतो


आईची करारी

नजर शिकवते

बाबांचा आवाज

मुलास नमवते


परीसरातही 

होतात संस्कार

मुलांचे आयुष्य

घेतसे आकार


शाळेत करतात

संस्कार शिक्षक

मित्र, सहचारी

सारेच रक्षक


पुस्तकातून पडे

संस्कारांचा सडा

प्रसार माध्यमे

टाकतात तडा


संस्कार शिदोरी

ठेवून मनात

प्रगतीचे पंख

पसरवू क्षणात


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational