STORYMIRROR

Manisha Awekar

Abstract

3  

Manisha Awekar

Abstract

संस्कार

संस्कार

1 min
201

दोन वर्षाचे गं बाळ

जसा गोळाच मातीचा

जाई शाळेला रोजचा

असे लाडका ताईचा  (१)


मोठा होई हळूहळू

हात गुरुजींचा पाठी

होई सवे अभ्यासाच्या

नीती संस्कारांच्या गोष्टी  (२)


रामायण सांगताना

ठसे मूर्ती राघवाची

सत्यप्रिय शूर वीर

शांत आज्ञाधारकाची  (३)


बालमन ओली भूमी

रुजतसे संस्कारात 

मन निर्भिड विवेकी

गुरुजींच्या शिक्षणात  (४)


नीट बोलणे वागणे

स्वच्छ शुद्ध आचरण 

नको मोह संपत्तीचा

ठेवा स्वाभिमानी मन  (५)


देती संस्कारांचे धडे

नम्रपणे वागणूक

प्रामाणिक नागरिक

गुरुजींच्या कष्टांतून  (६)


पाठी घेऊन संस्कार

मुले जाती परदेशी

संस्काराचे बळ भारी

नीती रुजली तळाशी   (७)


गुरु हेच परब्रम्ह

शिल्पकार थोर जगी

नागरिक घडवूनी

सार्थकता लाभे मनी  (८)



Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract