संपली आज ती दिवाळी
संपली आज ती दिवाळी
उशीर केलास यायला हाय, संपली आज ती दिवाळी
परत करूयात एवढे काय , संपली आज ती दिवाळी
जमा फटाके करेल तोही सकाळचा केर झाडताना
खुशीत येऊन बोलला माय, संपली आज ती दिवाळी
निघून गेल्या अशाच गाड्या कुणीच भेटायला न आले
उगीच आशेत थांबले पाय, संपली आज ती दिवाळी
असे दिवाळी जशी मलाईच थंड भांड्यात त्या दुधाळी
रुळावली काळजात ती साय, संपली आज ती दिवाळी
गुलाब झालाय थंड वारा खुमार येणार मैफलीला
बसाल थंडीत का निरूपाय, संपली आज ती दिवाळी
