संघर्ष ( शिरोमणी काव्य )
संघर्ष ( शिरोमणी काव्य )
संघर्ष
सामाजिक बाबासाहेबांचा
प्रेरणादायी सदा असा
हात जुळता माथा झुकवायचा
संघर्ष
भीवाचा बालपनी
शिक्षण वर्गाबाहेर बसुनी
घेती ना बैलगाडीत कोणी !
संघर्ष
नोकरी ठिकाणी
फाईल लांबून टाकती
पाणी न पिण्यास देती
संघर्ष
काळाराम मंदिरी
केली व्दारे खुली
अशी समानता ती स्थापली
संघर्ष
महाड रणांगणी
पेटवले चवदार पाणी
तहान तळ्याची ती भागवली
संघर्ष
पुणे करारी
महात्मा जीवनदान देती
समाजासाठी स्वाक्षरी ती करती
संघर्ष
सभी संविधान
बंगाल प्रांत निवडूण
देती घटना भारतीयांना लिखित
संघर्ष
राजीनामा मंत्रीपदाचा
हिंदू कोड बील
ते मंजूर ना होण्याचा
संघर्ष
धर्म बदलण्याचा
मूळ बौध्द धम्माचा
केला अंगीकार तो दीक्षाभूमी
संघर्ष
व्यापले आयुष्य
विश्वभुषण त्या बाबासाहेबांचे
जीवन चरित्र अभ्यासता त्यांचे
