STORYMIRROR

Pandit Warade

Inspirational Others

3  

Pandit Warade

Inspirational Others

स्नेह तिळाचा अखंड राहो

स्नेह तिळाचा अखंड राहो

1 min
208

स्नेह तिळाचा अखंड राहो नाते संबंधात

गुळातला गोडवा भरावा नित्य जीवनात ।।धृ।।


मकर संक्रांती उत्सव आला आनंद घेऊन

रवि तेजाने मानवी जीवन निघते उजळून

चैतन्य, स्फूर्ती, घेत जगावे सारे उत्साहात ।।१।।


निसर्ग अवघा फुलून आला बहर आंब्याला 

पेरू, बोरे, गहू, हरभरा, सवे ऊस वाणाला

आनंदाचे वाण वाटू या, गोडी बोलण्यात ।।२।।


थंडी पाऊस वादळ सोसत करतो मेहनत

संसाराच्या चक्रामधुन कधी नाही फुरसत

मजेत घालवू काळ थोडा पतंग खेळण्यात ।।३।।


उंच उंच त्या निळ्या आकाशी पतंग उडवू या

पतंगा सवे मन स्वप्नांना नभात फिरवू या

जीवनरूपी पतंग दोर देऊ प्रभूच्या हातात ।।४।।


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational