संध्याकाळ
संध्याकाळ


संध्याकाळ होतेय
वादळ घोंघावतेय
भरलेलं आभाळ कोसळतय
पाकोळ्या भिरभिरतायत
गार वारा झोंबतोय
पक्षी घरट्याकडं निघालेत
ओला पाऊस कुठंतरी
दूरवर जळतोय
झाडांच्या सावल्या
लांब लांब होत
रात्रीच्या कुशीत शिरतायत
भिरभिरणा-या टिटवीचा
आवाज उगीचच छळतोय
सगळी कडे अंधार आहे
मनात चिखल आहे
पुन्हा ती जुनी सलगी आठवतेय
डोळ्यांतला पावसाळाही
आताशा जवळीक करू पाहतोय
पाऊस अजूनही थांबत नाही न्
उन्हाळाही काही सोसत नाही
वादळ मात्र अवतीभवतीच
घोंघावत राहतंय न्
संध्याकाळ मात्र रात्रीच्या
कुशीत शिरू पाहतेय