संधिकाली
संधिकाली
निवांत धूसर संधिकाली
हात हाती घेऊन बैसलो
शब्दाविण अस्फुट गुपित
एकमेकां सांगून राहिलो (१)
निळसर निलीमा नभीचा
तळ्यातले प्रतिबिंब झुले
अवचित संध्या निशेकडे
डोंगरमाथी हिरवाई खुले (२)
धुक्यात अवचित वाट लपे
घनमाला नभांगणी दाटे
शांत निःशब्द स्पर्श बोले
प्रीतबंध दृढ गाढ गमे (३)
आठवांचा मधू संधिकाल
अजूनी संस्मरणीय मनी
पट उलगडे अगदी सुस्पष्ट
वेड्या कमलनयन कोंदणी (४)
