संधीप्रकाश
संधीप्रकाश
झाली संध्याकाळ
ओलावले मन
निळ्या आकाशाला
भिनले श्वास
परतल्या पावलांना
साद थांबल्या स्वप्नांची
उभ्या वळणाकडे
आतूरलेली नेत्र
ओसरलेल्या शब्दांची
ओझरतीच भेट
सैरभैर आकाशात
विखूरलेल्या भावना
का याव्यात त्यांनी ?
अश्या संध्याकाळ
का यावं उधान सागराला....
का भिनावेत श्वास ....
या संधीप्रकाशात ....
का .... का.... का....
