STORYMIRROR

Chandanlal Bisen

Abstract

3  

Chandanlal Bisen

Abstract

मृदगंध पावसाचा..!

मृदगंध पावसाचा..!

1 min
259

नभात दाटले काळे मेघ

काळ्या मेघाचा सुसाट वेग

सुसाट वेगाने मेघ धावती

मेघ धावती, प्रतीक्षेत मृदभेग..


धो-धो पडल्या पाऊसधारा

पाऊसधारा पडल्या धरणी

धरणीची लेकरे अनंत सारी

सुखावली मदमस्त मनोमनी..


पाण्याने व्याकुळलेली धरणी

धरणी भेगात झाली परिवर्तित

परिवर्तित मेघ कृपेने तृप्तरूपी

तृप्तरूपी धरणी अत्यानंदात..


नदी नाले ओहोळ जाती भरून

भरून येती पाण्याने विहिरी

विहिरीचे पाणी सहज घेण्या

घेण्याची मजाच खूप न्यारी..


शेतकरी राजा घेऊन सर्जा

खांद्यावरी नांगर घेऊनी

घेऊनी पालंदी च्या वाटे

वाटे चालला नवउमेदानी..


वाटे हवा मृदगंध पावसाचा 

पावसाच्या रिमझिम धारा

धारा भिजवी अंग चिंबचिंब

चिंब अंगाला झोमे थंड वारा..


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract