STORYMIRROR

Ramesh Khadke

Abstract

3  

Ramesh Khadke

Abstract

मृदगंध पावसाचा

मृदगंध पावसाचा

1 min
333

मेघ गरजती आकाशात 

विज कडाडून पाऊस आला

 मृगाच्या पहिल्या पावसाने 

मृदगंध चोहीकडे पसरला. 


मृदगंधाच्या सुगंधाने

मातीतून अंकुरते बिज

हिरवी सृष्टी पाहुनी

सुखावते मन आज .


नभातले पावसाचे थेंब 

उत्साहाने खाली निघाले 

एवढ्या लांबच्या प्रवासाने

गवताच्या पातीवर विसावले.


मृगाच्या पहिल्या पावसाने 

आनंदाने मोर नाचती

पिलं कुशीत घेऊन पक्षी

पावसाची गीते गाती. 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract