STORYMIRROR

duraga hodabe

Abstract

3  

duraga hodabe

Abstract

पावसात भिजताना...!

पावसात भिजताना...!

1 min
260

मन मोहरून हळूवार येते

भान हरपून पार जाते

थेंबांत जग सामावते

सारीच सृष्टी आनंदात न्हाते

पावसात भिजताना...!


अल्वारसा स्पर्श हा

देई आनंद आगळा

कवेत घ्यावा पाऊस सगळा

नाचून गाई अंगणात वाळा

पावसात भिजताना...!


हिरव्या राणी ; गवत फुले

वाऱ्यावरती आनंद झुले

फांदीवरती पक्षी बोले

कोरडे मनही ओले झाले

पावसात भिजताना...!


गंध मातीचा , हलके वारे

नयनांत घ्यावे साठवून सारे

मानात फुलती मयुर पिसारे

तुषार भिजवी तृप्त शहारे

पावसात भिजताना...!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract