समुद्र भेट
समुद्र भेट
तोच समुद्र तीच लाट
मनामध्ये कसे भावनांच्या
आठवणींचे तरंग दाटले फार
समुद्राच्या लाटा लाटात
गीत घुमत आहे आनंदाचे
ऐकावे नव्याने भान विसरून सारे
समुद्राच्या लाटेवर स्वार होऊन
सफर करावी त्याची
भेट म्हणून त्याने द्यावे
शिंपल्यातले मोती
किनाऱ्यावर पक्ष्यांची
किलबिल सुरू राहील
समुद्राच्या वाळूवर
शब्दांची नक्षी उमटत जाईल
अथांग व्यापकतेला
सौंदर्य लाभले निसर्ग नजरेचे
नजर रोखुन बघत रहावे
असे त्याचे रूप वेगळे
ओढ समुद्राची
अशी लागली आहे
समुद्रामध्ये लहरींची
स्पर्धा जशी रंगली आहे
समुद्रावर होडी जशी
तरंगत राही
तशी हृदयामध्ये
ओढ तुझी वाढत जाई
