।।समर्पण।।
।।समर्पण।।
साई नाम साई नाम घेवू चला घेवू चला
भाव भक्तीने मन शांती ने
सावट अंधारी सरली काळ झोप उडाली
झोपत्या दैवाला देवाने हाक मारली।।धृ।।
दैव उद्याचे सांगा कुणी का जाणिले
विश्वासाचे रूप मनोहर पाहिले
मागणे मागून सांगा कुणी काय मिळविले
न मागता साई ने सारे दिधले
घेणारे हात थकले मागणे न सरले
मिळवुनी सारे संग काय काय नेले।।१।।
सत्कर्माच्या वाटे पुण्याई लाभू दे
सौख्य तुझे माझे असेच वाढू दे
सार्तक्ता या जन्माची मज पाहू दे
सर्पणाची आहुती आज वाहू दे
यज्ञ कर्म पेटले कुकर्म जाळिले
सत्संगाने आज सोनियाचा दिनू पहिले।।२।।
साई म्हणता साक्षात ईश्वर अवतरले
कणा कणात साई माझे दिसले
घेता तुझे हे नाम तनमन मोहरले
साक्षात्कारी मोद नवा आज बहरले
अमृत घन बरसले चिंब चिंब केले
जुन्या उमेदीला नव्या पालवीने बहरले।।३।।
।।सद्गुरू श्री साईनाथ महाराज की जय।।
