स्मरण
स्मरण
आभाळ हळू जागे होते, रेशमी उन सावरते..
अळूच्या पानावरले , दव मातीत मिसळते
तप्त उन्हाच्या झळा , मनी आग भडकते..
सावळ्या डोहामध्ये , उन्ह तळाचा थांग घेते
पायवाटा बोलू लागती, सांज दुःखाचे गाणे गाते.
कवडसे धूळ झाले अन आभाळ दाटून आले
एकांताची उघडी कवाडे, अस्वस्थ मन रिते होते..
तुझ्या स्मरण-सावल्यांची माझ्या दारात रांगोळी खुलते..