समाधान की विज्ञान
समाधान की विज्ञान
माकडापासून बनला आदिमानव आणि मग झाली माणसाची उत्क्रांती
सुधारत गेले त्याचे दैनंदिन जीवन, विज्ञानातही त्याने केली प्रगती
अश्मयुगातला माणूस शिकार करून जगायचा
नोकरी, घर, जमीन, शिक्षण ह्या जाळ्यात नाही अडकायचा
आता आपल्या भूतकाळाकडे पाहून आजचा मानव हसतो
मी कधीकाळी तुझ्यासारखा होतो हा मला विनोदच वाटतो
माकड मात्र आश्चर्याने सुधारलेल्या मानवाकडे पाहते
ह्या ज्ञानी मानवाऎवजी मलाच का शांत झोप लागते ?
