STORYMIRROR

Yogita Takatrao

Inspirational

3  

Yogita Takatrao

Inspirational

सलाम सैनिक हो

सलाम सैनिक हो

1 min
32.1K


वाटतो नेहमीच आम्हा भारतवासींना तुमचा अभिमान

पेलली आहे समर्थपणे तुम्हीं देशाच्या संरक्षणाची कमान

करावा तेवढा कमीच आहे तुमचा सन्मान

सलाम सैनिक हो, तुम्ही आहात खरंच महान


प्रचंड आत्मविश्वास आणि मजबूत आहे इच्छाशक्ती

खरंच तुलना नाही तुमच्यासारखी तुमचीच देशभक्ती

रात्रंदिवस, ऊनपाऊस कसलीच नाही तुम्हास भिती

सलाम सैनिक हो, आदरणीय तुमची निती


युवापीढीचे आदर्श आहात होत राहील सैन्यभरती

प्रत्येक भारतीय सजग होत आहे आपल्या देशाप्रती

असंख्य वार झेलताना जवानांच्या रक्ताने सजते माती

सलाम सैनिक हो, प्रत्येक पावलात देशभक्तीचीच प्रचिती


कोणत्याही गोष्टीआधी पहिले तुम्हाला देशच दिसतो

प्राणपणाची बाजी लावुन प्रत्येक सैनिक लढतो

माता-पिता, पत्नी-मुले, बंधु-भगिनी नाही कसलाच हव्यास

सलाम सैनिक हो, प्रिय तुम्हाला रक्षणाचाच ध्यास


कल्पनाच नाही आम्हास समोर जेव्हा तुमच्या मृत्यू असेल

तुमच्या डोळयांत तेव्हाही भारतमाताच दिसत असेल

कर्तव्यदक्षता आणि चाणाक्ष नजर यांची अनोखी सांगड असेल

सलाम सैनिक हो, आदरणीय तुमची वृत्त्ती मनात वसेल


शेवटच्या क्षणापर्यंत लढणे तुमचे जाणार नाही व्यर्थ

अजरामर राहतील तुमचे कष्ट करु प्रयत्नांची शर्थ

नतमस्तक तुमच्यापुढे अतुलनीय शौर्य निःस्वार्थ

सलाम सैनिक हो, कसे जगावे तुमच्याकडुन उमगला अर्थ


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational