सखे
सखे
थांबशील का सखे गं घाटावरी जरासे
मोजून पाहू या गं माझे तुझे उसासे
कोणीच नाही येथे,वळणावरी निवांत
मज भ्रांत ही सखे की हे दोन का शशांक?
बाहुत बांधू दे गं वा चुंबू दे वसंत
ओठांस स्पर्शू दे तव मकरंद हा अनंत
का सांग मिटून घेते हे द्विदल पापण्यांचे
जेव्हा हे पाश पडती कटी भोवती करांचे?
विरघळून भाव गेले विरघळून तू ही गेली
हे चांदणे नभाचे चोरून का गं ल्याली?
पाठीवरील तुझ्या गं विश्रांती कुंतलांना
बाजूस सारुनी दे उतरू अधर खगांना
बोलू नकोस काही,मी अबोल होतो
उघडू नकोस दल हे माझाच तोल जातो

