STORYMIRROR

Dr.GAURI NIRKHEE

Inspirational Others

4  

Dr.GAURI NIRKHEE

Inspirational Others

सिंधूताई

सिंधूताई

1 min
413

एक होती मराठमोळी ललना

नाव होते तिचे सिंधूताई

नावाप्रमाणेच होती 

तिच्या हरुदयातील करुणा

नदी जशी खळखळ वाहते

अनंत अडथळ्यांना पार करते

सिंधूताई देखील तशीच जगली

अडथळ्यांना ती ना घाबरली

विपरीत परिस्थितीत ना डगमगली

स्वतःच्या दुःखाना बाजूला सारले

अनाथांना मनापासून जोपासले

एक एक मूल सांभाळत

माईंचे समाजकार्य बहरले

आई, माई सर्वांनाच प्रेरणा देत गेली

तिच्या विचारांची सर्वांनीच दखल घेतली

अनेक पुरस्कारांची प्राप्ती झाली

अखेर पद्मश्री मिळाली

ते मराठमोळ रुप

पुरस्कार सोहळ्यात बघून

मराठी अस्मितेची जाणीव झाली

माई आज पद्मश्री झाल्या

नदीच्या प्रवासाला अंत नसतो

सागरातच तिचे विलिनीकरण होते

सिंधूताई ही नदी होती

मायेची,करुणेची,समाजकार्याची

आज अनंताच्या प्रवासाला निघालेली नदी

मागे ठेवून जात आहे

समाजकार्याचा वारसा

अपेक्षा नव्हती कुठलीच त्यांना

कुणी अनाथ राहू नये हीच होती प्रार्थना

माईला जरी पोरकी झाली लेकरे

तरी माय कुठे सोडून जात असते का??

जिथे जाईल तिथूनही

आर्शिवादच देत असेल सर्वांना


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational