STORYMIRROR

Priti Dabade

Inspirational

4  

Priti Dabade

Inspirational

सिंधुताई सपकाळ-एक प्रेरणा

सिंधुताई सपकाळ-एक प्रेरणा

1 min
272

बालपणातच संसारात

पडावे लागले

खडतर प्रसंगांना

तोंड दिले


अनाथांसाठी सेवाकार्य

करणारी माऊली

बनली ती 

साऱ्यांची साऊली


मोह सोडुनी

संसार त्यागूनी

मिळाली निराधारांना

प्रेमळ जननी


मोडली सारी

परंपरा धाडसाने

निराशेला बदलले

आशेच्या किरणाने


सोसल्या यातना

अन् दुःख

समाधान बघताना

लेकरांचे सुख


आरोग्य, शिक्षणाची 

उचलली जबाबदारी

त्यांच्या सुरक्षेची

घेतली खबरदारी


कधीच नाही 

घेतली माघार

प्रेरणादायी कीर्ती

पसरली सातासमुद्रापार


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational