श्वास
श्वास


कातळाशी लढताना
एक एक श्वासाला
स्वतःला त्यातच गुंतवुन घेत
गंधीत परिसाला स्पर्शत
निळ्या सावळ्या कल्पनांना
आपुलकीचे दोन शब्द सांगत
घोंगावणा-या अवखळ वा-याशी
झालेल्या गुजगोष्टींना जतन करत
क्षण प्रेमांचे, क्षण विरहाचे
पुन्हा आठवत आठवत
पुन्हा पुन्हा हवेत गिरक्या मारतोय
आणि ..........
पुन्हा पुन्हा त्या कातळाशी लढताना
स्वतःच स्वतःला एका एका श्वासात
गुंगून जातोय न् गुंतत जातोय
का गुंगतोय त्याच त्याच श्वासात ?
समजत नाही उमजत नाही
आणि खरं सांगू ...
उमजून घ्यायची इच्छाही नाही