शूरवीर संभाजी राजे
शूरवीर संभाजी राजे
शूरवीर संभाजी राजे
युवराज शिवरायांचे
छावा सिंहाचा वीरता
नसानसातून वाहतसे (१)
आग्र्याहून निसटताना
पेटा-यामधूनी पोबारा
वेषांतर करुनी तयांनी
सुरक्षित ठेवी युवराजा (२)
गनिमी काव्यांनी मुघलांना
पळता भुई थोडी केले
पराक्रमाला गालबोट
फितुरीचे कसे लागले? (३)
आदर्श मराठी राज्य स्थापले
संभाजींनी वाढवले असते
परि नालायक फितुरांनी
पकडण्यास सहाय्य केले (४)
बादशहाने आदेश दिधला
धर्मांतराचा वीर संभाजीला
धुडकावुनी लावि त्वरितचि
धर्म प्राणाहूनही प्रिय मला (५)
हाल करुनी डोळे काढूनी
छाव्याला मरणयातना देई
परि मानी पराक्रमी संभाजी
धर्मापासूनी ढळला नाही (६)
मृत्यूलाही जिंकले राजांनी
तिथे ओशाळला मृत्यू
शूर वीराची शोकांतिका
येती आजही नयनी अश्रू (७)
