शून्यातून विश्व निर्माण करू
शून्यातून विश्व निर्माण करू
अथक परिश्रमांची आपण
सर्वांनी कास धरू ,
चला सर्वांनी शून्यातून
विश्व निर्माण करू .
थोडे थोडे करून आपण
यशाच्या शिखरावर जाऊ ,
परिश्रमाने मिळालेल्या
यशाचा आनंद घेऊ .
यशाचा असा आनंद
मग चिरकाल टिकेल ,
परिश्रमाची अशी व्याख्या
नवीन पिढी शिकेल .
