श्रमप्रतिष्ठा
श्रमप्रतिष्ठा
घेई घेई सुगंध,
गाई गाई अभंग,
श्रम करीत अखंड,
मुखी हरिनाम,
चालतो नांगर,
शेतामधी
नसे काही थकवा,
हसरा चेहरा,
अखंड श्रम करितसे,
फुलवितो मळे,
भाजी आणि फळे,
उदारपणे जनलोका,
वाटतसे
साधा कपडा, साधी राहणी,
मोत्यांचे तुरे, ताटाला लागती,
ऊसाचे मळे,ज्वारीचे खळे,
श्रमामुळे
भाकरीची चव आनंदे घ्यावी,
भाकर द्यावी, एकमेका
आपुले हात पोळुनिया
करावे श्रम, नेणवे, पराग,
मध वेचुनी घेतला सारा,
करावे निर्माण पोळे मोठे,
मधाचा कांदा आत लोपला
श्रम करीत असे,
आनंदे वर्तने नवे नवे, काही,
निर्माण करावे, वर्तावे आनंदे, जनामाजी,
आपुले जीवन आनंदे घालावे,
श्रमाला प्रतिष्ठा, द्यावी आधी
