श्रमाचे महत्व
श्रमाचे महत्व
क्षणोक्षणी मेहनतीने
दिले ज्यांनी सत्व
विचारावे त्या माणसा
श्रमाला आहे किती महत्व...
दिवसभर काबाडकष्ट करून
मिळते एका वेळची भाकरी
विचारावे त्यांना करावे लागते
किती पोटासाठी चाकरी...
निःस्वार्थपणे करावे श्रम
मिळेल नक्कीच फळ
जेवढे श्रम जास्त करू
तेवढेच येते उत्साह आणि बळ...
श्रम करूनी कित्येक जन
गेले स्वःबळावर पुढे
अनेकांच्या मेहनतीचे शिकायला
मिळतात नवीन धडे...
श्रम ज्या महापुरुषांच्या
अंगी निःस्वार्थ जडले
देशाच्या हितासाठी अनेक
थोर महापुरुष घडले...
