श्रमाचे महत्त्व
श्रमाचे महत्त्व
ओघळणाऱ्या घामाच्या धारा
सावलीचा आडोसा शोधत असतात
वाफाळलेल्या वाऱ्याचा दाह
श्रमाचे महत्त्व सांगत असतात
आता श्रमच कमी झालेत
त्याचे महत्त्व महत्त्वाचे नाही
चुटकीसरशी बटन दाबून
प्रत्येक काम श्रमहीन होई
परिश्रमाचा अनपेक्षित परिणाम
थकलेल्या मनास आनंद देतो
श्रमाविना शरीर रोगाला
स्वतः आवर्जून निमंत्रण देतो
मन, बुद्धी, शरीराचे कष्ट
संस्काराचे फळ देतात
कष्टातून मिळालेल्या यशालाच
खरेखुरे यश म्हणतात !!!
