STORYMIRROR

Pratibha Bilgi

Inspirational Others

4  

Pratibha Bilgi

Inspirational Others

श्रम

श्रम

1 min
286


समाजातील व्यवस्था बघून , होतात वेदना मनाला

"हाती माझ्या काही नाही" , म्हणत प्रत्येकजण हरला


आवाज बुलंद केला , तर जिंकू शकू जगाला

अशक्य अस काहीच नाही , प्रयत्न केल्यास मनुष्याला


हार मानूनी , निराश होऊन , कधी न तोडगा मिळाला

समस्यांशी लडा करूनी , मिळवून दाखव स्थान या दुनियेला 


घाव होतील भरपूर , कष्टही होतील हृदयाला 

वेळ पण जास्त नाही लागणार , स्वप्न सारी तुटायला 


हिम्मत लागते , जोश लागतो , या सगळ्यातून मार्ग काढायला 

श्रम तर जरूरी आहेत , इच्छा - आकांक्षा सर्व पूर्ण व्हायला


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational