श्रीमंत आणि गरीब
श्रीमंत आणि गरीब
लाॅकडाऊन मुळे सगळेच आहेत घरी
नवरा बायको त्यांचा बाबू आणि त्यांची परी
श्रीमंंताच्या घरी कधी बासुुंदी तर कधी श्रीखंड पुरी
दुसरीकडे मात्र शिळी भाकर भात अन डाळीच पाणी
गरीबाच्या घरी
श्रीमंताकडे दही दूध लोण्याने भरलेले माठ
पण गरीबाच्या घरी मात्र दोन घास असलेल ताट
श्रीमंंताकडे नाश्ताला कधी ढोकळा पिझ्झा केक
गरीबाच्या घरी मात्र फक्त पार्ले बिस्किटाचा पुडा एक
श्रीमंत लोक खातात पंच पक्वान्न दिवसातून चार वेळा
पण गरीब मात्र खातो एकदा शिजलेल दोन वेळा
