'श्री शिवराय '
'श्री शिवराय '


' श्री शिवराय '
मराठमोळ्या मायभूमीचा मराठीच बाणा
मानबिंदू तो शिवछत्रपती अमुचा हा राणा
काळरात्र आली
अवनी थरथरली
माय मराठ्यांची
भगिनी भ्रष्ट केली
कुणी पुसेना कुणी उठेना वीर नष्ट झाला,
मांड ठोकूनी महारूद्र जणुं पुढे उभा ठाकला
माय उभी पाठी
जगदंबा माऊली
स्वये जिजाऊ ती
तुजला जागविती
रक्षण करिते आई भवानी,घे हाती तलवार
कराल दाढापुढे ठकूनि रिपूवरी करी तूं वार
फत्ते ही झाली
गडे बहु जिंकिली
आदिल पातशाही
अवघी डळमळली
ताना,येसा,प्रताप,बाजी कितीक रणी झुंजले
गर्जुनि हरहर महादेव ते पावन हो झाले
अफजुल्या वधिला
शास्ता शासिला
यवनांच्या
हाती
तुरी तुम्ही दिधल्या
शंभूबाळासवे प्रकटला चरणस्पर्श केला
शिवबा आला भुवनी परतला मोद मनी झाला
रामदास स्वामी
हर्षाने फुलले
राजियांसी त्यांनी
बहुत कौतुकीले
पराक्रमी तूं श्रीमान योगी धर्म वाढवावा,
अवघा करूनि कल्लोळासि मराठ मिळवावा
गोब्राह्मण पालक
श्री शिवछत्रपती
दुरितांचे जगती
तिमिर कसे हरती
काळरात्र ही सरली आतां अरुणप्रभा फाकली
स्वराज्य आले सुराज्य झाले आनंदवनभुवनी
रघुपती रामाची
अगाध ही लीला
समर्थ गुरू बरवा
शिष्योत्तम शिवबा
गुरू नेणता,प्रभू जाणता संयोगचि झाला,
अलौकिक या अद्वैताचा मणिकांचन लाभला