STORYMIRROR

Prashant Shinde

Inspirational

3  

Prashant Shinde

Inspirational

श्री महालक्ष्मी प्रसन्न..!

श्री महालक्ष्मी प्रसन्न..!

1 min
28.3K


श्री महालक्ष्मी तू । आमची आई ग ।

होतसे घायी ग । पाहण्याची ।।


पहाट पारी मी । तुझ्या दरबारी ।

येतो लवकरी । दर्शनाला ।।


काकड आरती । लई यरवाळी ।

भल्या ग सकाळी । करण्याला ।।


भक्त मंडळीही ।लवकर येती ।

सुदर्शन घेती । न्याहाळून ।।


तृप्त होवोनिया । सेवा ही करिती ।

आरती धरती । उभारून ।।


आशीर्वाद तुझा । मिळू दे सर्वांना ।

सांभाळी भक्तांना । मायेपोटी ।।


येतात पहाटे । दर्शन घेण्याला ।

तुला पाहण्याला । प्रेमापोटी ।।


कृपा करी आई । हात पाठीवरी ।

ठेव झडकरी । आवर्जून ।।


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational