श्रध्दांजली
श्रध्दांजली
काव्य प्रकार ...**
मायभू साठी
जन्मास घातला
कां मृत्यू ठाकला
तुझ्याच पाठी ...
भीती प्राणांची
कधी न भासली
ओढ मनातली
देश मानाची ...
अंतीम क्षण
सामोरी दिसला
हसत झेलला
कठोर मन ...
कर्तव्य सदा
जीवापेक्षा मोठे
बाकी सारे खोटे
खरी ज्ञानदा ...
व्याकुळ झाले
चिंतीत ते जन
कैसे हे मरण
तुजला आले ...
कठोर असा
देवा तू कां होशी
सुटला तो दोषी
न्याय हा कसा ??