श्रावण...!
श्रावण...!
श्रावणात सोमवारी सकाळी सकाळी
वट्ट उठाव असं जरा पण वाटत नाही
नको असलेल्या शाळेत देवा
सोमवारी पहाटे मला जावं वाटत नाही
मनाप्रमाणे मला कोण झोपू देत नाही
वाटत मला काय हे कोण ऐकत नाही
रडायचं तर रडू पण देत नाहीत
सुखं मला कोण जगू पण देत नाहीत
प्रथम आंघोळीची मान मला देतात
भाग्य उजळण्यासाठी शाळेत धाडतात
तळमळ माझी इथे कोण जाणतात
आता जा शाळेत उद्या बघू म्हणतात
नंतर नंतर करीत सारे वर्ष पार पाडतात
दादा ताई सारख मला कुठे बघतात
चिवचिवाट माझा दाबून टाकतात
हो तुझ्या साठी सारे घेतो म्हणतात
उसने अवसान आणून मी शाळेत जातो
देवाच्या कृपेने शाळा सुटता घरी पळत येतो....!!!
