शोध सुखाचा
शोध सुखाचा


शोध सुखाचा लागता...
हसू येई ओठांवर,
देता निःस्वार्थपणाने
दान ते ओंजळभर!
रोज उगवता सूर्य....
न्याहाळणे नशीबच,
नवलाई जीवनात
समाधानी आनंदच!
आपल्याच अंतरात....
शोध, बोध हा लागतो,
ऐक हाक मनातली
ध्यास शांतीचा भावतो!
अनुभव, अनुभूती....
क्षणोक्षणी आत्मा देतो,
मार्ग प्रसन्नवृत्तीचा
ईश्वरचरणी नेतो!