STORYMIRROR

SURYAKANT MAJALKAR

Abstract

3  

SURYAKANT MAJALKAR

Abstract

शोध देव माणसातला

शोध देव माणसातला

1 min
404

कैसा छंद वेडया लागला जीवाला,

अजी भेटलो मी माणसातल्या देवाला,

वाजविला टाळ, वाजविला मृदूंग,

होउनीया धुंद देह भान हे हरपला,

जो जे इच्छिल तो ते मिळविल,

मग सांग खुळ्या देव ना मागितला,

कित्येक पापकर्म, मोजकेच पुण्यभ्रम,

काय हिशेब देशी देव त्या जाणिवेला,

ऐसा छंद शहाण्या सांगे अशात मनाला,

नको मंदिरदारी, शोध देव माणसातला.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract