STORYMIRROR

Pandit Warade

Inspirational Others

4  

Pandit Warade

Inspirational Others

शक्तीचे आगार नारी

शक्तीचे आगार नारी

1 min
253

शक्तीचे आगार नारी

मायेचे भांडार नारी

वेळप्रसंगी संकटसमयी

तळपती तलवार नारी

घरात स्वयंपाक, धुनी, भांडी

पै पाहुणा, आला गेला, मुले,

घराला सांभाळणारी गृहिणी 

अन्नपूर्णा बनून खाऊ घालणारी 

संकट समयी कंबर कसून पतीच्या 

खांद्याला खांदा लावून काम करणारी,

मुलांचे संस्कारी फुले बनवणारी,

मुलांच्या परीक्षेच्या काळात

कुणाच्या आजारपणात रात्र रात्र जगणारी,

रुग्णांची सेवा करणारी डॉक्टर, नर्स, 

कंडक्टर, शिक्षिका, आशा ताई, गृहिणी

अशा अनेक रूपाने वावरणारी

आदिशक्तीचे स्वरूप नारी

प्रेमाचे सत्यस्वरूप नारी

ईश्वराचे रूप नारी

आदिमाया, आदिशक्ती, दुर्गा,चण्डिका, 

महिषासुर मर्दिनी नारी

घराचा, समाजाचा, देशाचा

कुटुंबाचा आधार नारी


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational