शिवशाहीचा शिवसूर्य तळपता
शिवशाहीचा शिवसूर्य तळपता
शिवशाहीचा शिवसूर्य तळपता
तलवारीच्या पात्यासम भिडला
जिजामातेच्या गर्भकोंदणात
पराक्रमी हिरा शिवाजी घडला
जरी गनिम होताच महाकाय
केले शौर्याने त्यास नामोहरम
कीर्तीचा त्यांच्या डंका जगभर
मानले जनहित कर्तव्य परम
गातो गुणगान शौर्य पराक्रमाचे
अभिमाने फुगते आमची छाती
शिवरायांच्या पदस्पर्शाने पुनीत
बनली मावळातली काळी माती
मूठभर मावळ्यांच्या सोबतीने
उभारले त्यांनी हिंदवी स्वराज्य
रयतेला देऊनीच सुरक्षित स्थैर्य
बनविले महाराष्ट्राचे हे सुराज्य
