शिक्षणाचे कवाड
शिक्षणाचे कवाड
ज्ञान कवाड खोलले
स्त्रीला फुले दांपत्यानी
अज्ञानाचा तम विरे
प्रगतीच्या किरणांनी
रांधा वाढा उष्टी काढा
हाच जीवनाचा साचा
कवाडाने जादू होता
तिने उघडली वाचा
सर्व क्षेत्रे पादाक्रांत
अंतराळी विहरते
पाणबुडी चालवुनी
रणक्षेत्र गाजवते
श्रेय फुले दांपत्याला
कष्ट सोसले अपार
ज्ञानदान महादान
महाथोर उपकार
