STORYMIRROR

Bharthi Tidke

Children

3  

Bharthi Tidke

Children

शिक्षण पद्धती

शिक्षण पद्धती

1 min
424

प्राचीन काळी शिक्षण पद्धती

होती खूप छान

गुरूच्या आश्रमात

मिळे सगळे ज्ञान


नंतर बदलली

पद्धत शिक्षणाची

शाळेच्या भिंतीत

औपचारिक स्वरूपाची


आता आला कोरोना

आले ऑनलाइन शिक्षण

मोबाईल, लॅपटॉपवर बसून

घ्या म्हणतात घरीच शिक्षण


शहरात ऑनलाईन अभ्यास

यशस्वी होणार

पालक जागरूक

डिजिटल साहित्य उपलब्ध होणार


गावामध्ये शिक्षण

ऑनलाइन होणार

नाही कोणाजवळ

स्मार्ट मोबाइल

अभ्यास कसा होणार


शाळेत मोबाईलला

होता प्रतिबंध विलक्षण

आता तोच मोबाईल

चालवतो शाळेचे शिक्षण


Rate this content
Log in

Similar marathi poem from Children