ओढ पावसाची
ओढ पावसाची

1 min

85
ओढ पावसाची वाटे मला खूप,
आतुरलेल्या मातीला वाट पाहावी लागते खूप
येतात काळे ढग हातात हात घालून,
आणतात संगे आपल्या सावलीचे पांघरून
ग्रीष्माने तप्त धरणीस, मीळतो थोडा सुकून
येतात पहिल्या सरी, जाते कशी मी हरपून
नभोमंडपातुनी पडतात सरी,
हर्षित होते मन, प्रफुल्लीत होते धरती, आणि प्रसन्न होते मन
हिरव्याकंच निसर्गातून नटली सृष्टी, बहरली झाडे वेली आणि सजली दृष्टी.
थुई थुई मयूर नाचे, नैनी रोमहर्षक रचे, धरती सजली हरितक्रांतीने, पृथ्वी हसली हिरवळीने.