साने गुरुजी
साने गुरुजी
कोकणात खोताच्या कुटुंबात
साने गुरुजींचा जन्म झाला छान
मानवतेची अलौकिक देणगी
शिक्षकी पेशा स्वीकारला मान
आई त्यांची आद्यगुरू
गरीब परिस्थिती फार
खरा तो एकची धर्म सांगितले
जगाला प्रेम द्यावे अपार
श्यामची आई अजरामर
मुलांसाठी लिखाण केले आकारी
विनोबा भावे यांचा प्रभाव
गीता प्रवचन ग्रंथ साकारी
साधना साप्ताहिकाची स्थापना
बलसागर हे सांगितले राष्ट्रभक्तीपर गीत
सामाजिक सुधारणेचे पुढारी
विठ्ठल मंदिर खुले झाले नित
सामाजिक एकोपा गुरुजींनी दिला
भारतीय संस्कृती जोपासली
महात्मा गांधीचा जीवनी परिणाम
आईची माया पैलू रेखाटली