निसर्गाच्या उपकार
निसर्गाच्या उपकार
निसर्ग आपला मित्र
निसर्ग आपला सखा
सदा करी उपकार
वाटे नेहमी नवखा
सूर्य देतो तेजाची
किरणे पहाटेच्या वेळी
लखलखता प्रकाश देई
सर्वांसोबत समान खेळी
वृक्षवल्ली सोयरे वनचरे
निसर्गाचे अनेक रूप
जीवन जगण्याची साधने
देती निसर्ग सर्वांना खूप
हवा पाणी मिळते निसर्गातून
वृक्षांपासून मिळती फळे
पान फूल खोड सारे महत्त्वाचे
उपयोगी असतात बघा मळे
निसर्गातच वाढतो आपण
अनुभवाचं मिळते लेणं
निसर्गाचे आठवावे रूप
मानवतेचे जपावं देणं
मनुष्य झाला स्वार्थी
निसर्गाचे रक्षण न करी
पर्यावरणाचा करतो ऱ्हास
निसर्गाचे उपकार असते तरी