माझे बाबा
माझे बाबा
माझे बाबा आहेत
सोज्वळ स्वभावाचे
आशिर्वाद देती नेहमी
प्रसन्नचित्त मनाचे
आईची थोरवी जशी
असते बघा महान
तसेच बाबा सुद्धा
खेळवणारे छान
संसाराच रहाटगाडग
चालवतात बाबा साकार
सुखदुःखात प्रेम भरतात
आनंद देतात अपार
माझे बाबा बापमाणूस
प्रेमाचा अमुल्य ठेवा
जीवनी मार्ग दाखवणारे
संसारात देतात मेवा
माझे बाबा म्हणजे
अपरिमित कष्टाची धाप
प्रेमाचा निखळ झरा
हृदयी स्मृतीची छाप