श्रावण बहरुनी आला
श्रावण बहरुनी आला
1 min
14
श्रावण बहरुनी आला
आनंदित झाले मन
थुईथुई मयुर नाचते
बावरले माझे मन
सणांची घेऊनी पर्वणी
आला माझा श्रावण
शेतकरीही आनंदी
धरती झाली पावन
नभोमंडपातूनी पडतात सरी
हर्षित झाले माझे मन
श्रावण बहरूनी येता
प्रसन्न झाले हे जीवन
क्षणात सर सर करी
मधेच उन्हाची कडी
इंद्रधनु अंबरात दाटे
माझिया मनिया भिडी
हिरव्याकंच निसर्गातून
श्रावण बहरूनी आला
चैतन्याच्या स्पंदनाने
अणु-रेणूत मोहरला
